Leave Iran : तत्काळ इराण सोडा…! परराष्ट्र मंत्रालयाचे भारतीयांना आवाहन; हेल्पलाईन नंबर केला जारी
इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणाव वाढतच चालला आहे. कुठल्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता असून या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे.

Leave Iran : इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणाव वाढतच चालला आहे. कुठल्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता असून या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे.
खमेनी यांचे सरकार निदर्शकांवर कारवाई करत असताना, जानेवारीमध्ये जारी केलेल्या सल्ल्याचा पुनरुच्चार भारत सरकारनेही केला. इराणमधील भारतीय दूतावासाने देशातील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे. भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय दूतावासाने नागरिकांना दूतावासात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. इराणमध्ये इंटरनेटच्या समस्येमुळे नागरिक रजिस्ट्रेशन करु शकत नसतील, तर भारतात राहणार्या कुटुंबांच्या सदस्यांना रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे अपील करण्यात आले आहे. त्याशिवाय नागरिक [email protected] वर ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात.
हेल्पलाइन क्रमांक
+989128109115; +989128109109; +989128109102; +989932179359





