‘अभिनय सोड इडली-वडे विक’; पहिला चित्रपट हिट तरीही अभिनेत्यावर झाली टीका

Suniel Shetty | बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र सुरुवातीला त्यालाही फार कष्ट करावे लागले. सुरुवातीला त्याचे दोन चित्रपट बंद पडले. ज्यानंतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही त्याला खराब अभिनेता असल्याचे म्हंटले. त्याला रेस्टॉरंटमध्ये इडली-वडे विकण्याचाही सल्लाही देण्यात आला. सुनील शेट्टीने याबाबत खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत सुनील शेट्टीने सांगितले की, ‘फौलाद आणि आरजू हे दोन चित्रपट कधीच रिलीज होऊ शकले नाही. आरजू चित्रपटासाठी 60 ते 65 दिवस शूटिंग केले. मात्र दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये झालेल्या मतभेदानंतर हा चित्रपट कधीच रिलीज होऊ शकला नाही. तर, फौलादचे दिग्दर्शक डेव्हिड धवन हे त्यांच्या न्यूकमर इमेजमुळं चिंतेत होते त्यामुळं त्यांनी तो प्रोजेक्ट सोडला.’
1992 मध्ये बलवान चित्रपट रिलीज झाला तेव्हा मात्र तो सुपरहिट ठरला होता. मात्र एका समीक्षकाने सुनील शेट्टीबाबत निगेटिव्ह लिहलं होतं. यावर सुनील शेट्टीने खुलासा केला की, एका मोठ्या समीक्षकाने म्हटलं होतं की चित्रपट जरी चालला असला तरी अभिनेता वाईट आहे. त्या समीक्षकाने सुनील शेट्टीची चालण्याची स्टाईलची खिल्ली उडवली होती. याला तर रेस्टॉरंटमध्ये इडली-वडा विकयला पाहिजे, असे म्हंटले होते. समीक्षकांच्या या कमेंटवर सुनील शेट्टी यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांच्या अभिनयाचे काम सुरूच ठेवले. Suniel Shetty |
९० च्या दशकातील आघाडीचा अभिनेता असलेला सुनील त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. तो लवकरच अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. ही जोडी ‘हेरा फेरी ३’ मध्येही एकत्र दिसणार आहे. Suniel Shetty |
हेही वाचा :
शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा





