कसब्यात महाविकास आघाडीचे धंगेकर आघाडीवर; संजय राऊतांची पाहिली प्रतिक्रिया
Updated On:

पुणे – कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. तर हेमंत रासणे हे पिछाडीवर आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी कांटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाचव्या फेरीमध्ये धंगेकर यांनी तब्बल 4612 मतांनी आघाडी घेतली आहे.
अशातच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले,’ कसब्यात भाजपचा गेली 40 वर्ष होणारा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच होत आला आहे. आज शिवसेना ही मविआतील घटक असून आम्ही सगळे एकत्र आल्याचा परिणाम कसब्यात दिसून येत आहे. आणि चिंचवड मतदारसंघात भाजपला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.’





