Laxman Hake : ‘दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथविधी करता, मग दुःख फक्त आम्ही करायचे का?’; बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ट्विस्ट
Laxman Hake : सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यामुळे 6 महिन्याच्या आत विधिमंडळाचं सदस्य होणं अनिवार्य

Laxman Hake : अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलंय. अजितदादांच्या राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित आहे.
35 वर्ष ज्या मतदारसंघावर अजित पवारांची एकहाती सत्ता होती. तेथे आता दादांशिवाय निवडणूक होणार असल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु यात नवा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतं आहे.
कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केले आहे. Laxman Hake
काय म्हणाले लक्ष्मण हाके? Laxman Hake
“लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे चुकीचं आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात.आजोबा, नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचे का?” असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी केला.![]()
“आमच्या ओबीसी समाजाचे आरक्षण एका बाजूला संपवून टाकण्यात आलं आहे. आमचे सर्व प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. अशावेळी अन्यायाला वाचा फोडायला निवडणुकीसारखा दुसरा कोणता पर्याय आहे का? सुप्रिया सुळे जर प्रोफेशनल राजकारण करत असतील तर आम्हीही तसे करू,” असंही हाके म्हणाले.
“बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेलं अहिल्यादेवींचं नाव बदलण्याचा जीआर हे शासन काढू शकतं, आम्ही ते कधीही सहन करणार नाही. ओबीसींचे कोणतेच प्रश्न स्वर्गीय अजितदादा किंवा या सरकारने सोडवले नाहीत, आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असेल किंवा होस्टेल असेल असे अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो मात्र त्याला न्याय कधीच मिळाला नाही,” असेही हाके म्हणालेत.
दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं युगेंद्र पवारांना बारामतीत अजित दादांविरोधात उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी पोटनिवडणुकीत उमेदवारी देणार नसल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्ट केल आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जरी उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट केली असली तरी मविआतील इतर घटक पक्षांनी मात्र आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
सुनेत्रा पवारांना विधिमंडळाचं सदस्य होणं अनिवार्य Laxman Hake
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यामुळे 6 महिन्याच्या आत विधिमंडळाचं सदस्य होणं अनिवार्य आहे. यातच आता बारामतीत लक्ष्मण हाके शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याने पुढे काय चित्र पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा :






