Bishnoi Gang : बिश्नोई गँगचे काम कसे चालते? जाणून घ्या A To Z माहिती

काही वर्षांपूवी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने हत्या केली होती. या हत्येनंतर आता ही गॅंग महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाली आहे. या गॅंगने काल सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या केली.
दाऊद इब्राहीमप्रमाणे लॉरेंस बिश्नोई याने देशभरात आपले नेटवर्क उभे केले आहे. देशातील 11 राज्य आणि 6 देशांमध्ये त्याचे साम्राज्य पसरले आहे. आता कोणते राज्य कोण सांभाळत ? तसेच त्यांना शस्त्र कुठून भेटतात याबाबद्दल जाणून घेऊयात…
कोणाकडे कोणत्या राज्याची जबाबदारी?
गोल्डी बराड याच्याकडे कॅनडा, पंजाब आणि दिल्लीची जबाबदारी दिली आहे. रोहित गोदारा याच्याकडे राजस्थान, मध्य प्रदेश आणि अमेरिकेची जबाबदारी दिली आहे. तसेच पोर्तुगाल, दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालमधील गँगची कमान अनमोल बिश्नोई सांभाळत आहे. हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये कला जथेडी गँगची सूत्र सांभाळत आहे. या संपूर्ण गँगचा अहवाल थेट साबरमती कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला दिला जात असतो.
शस्त्र कुठून मिळतात?
बिश्नोई गँगकडे मध्य प्रदेशातील मालवा भागातून शस्त्रे येतात. त्यात धार, सेंधवा, बरवानी, रतलाम, खंडवा, बुरहानपूर, खरगोन या गावांचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मेरठ, मुझफ्फरनगर आणि अलीगढ येथून त्यांना शस्त्र मिळतात.बिहारमधील मुंगेर आणि खगरिया भागातून शस्त्र ही गँग मागवते. तसेच पंजाबमधील सर्व शहरे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. याशिवाय पाकिस्तान, अमेरिका, रशिया, कॅनडा आणि नेपाळमधून देखील त्यांना शस्त्र पुरवली जातात.
बिश्नोई गँगकडे 700 पेक्षा जास्त शूटर
सध्या बिश्नोई गँग सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बराड ऑपरेट करत आहे. बिश्नोई गँगमध्ये 700 पेक्षा जास्त शूटर आहेत. त्यातील 300 जण पंजाबमधील आहे. लॉरेंस बिश्नोई गँग फक्त पंजाबपर्यंत मर्यादीत नाही. त्याचे देश-विदेशात अनेक ठिकाणी नेटवर्क आहेत. ही गॅंग सोशल मीडिया आणि इतर मार्गाने आपल्या गॅंगमध्ये भरती करते.





