आता पुण्यात अनुभवा लक्झरीची नवी व्याख्या; सेंट्रल शिवाजीनगरमध्ये ‘व्यंकटेश लॉरेल’चा शुभारंभ

पुणे – व्यंकटेश बिल्डकॉनतर्फे (Venkatesh Buildcon) ६ व ७ एप्रिल रोजी त्यांचा नवीन प्रकल्प – व्यंकटेश लॉरेलचा (Venkatesh Laurel) भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. हा प्रकल्प व्यंकटेश बिल्डकॉनच्या विश्वास आणि वर्षानुवर्षांच्या परंपरेचेच प्रतीक आहे. २००० पासून, व्यंकटेश बिल्डकॉनने ग्राहकांची गृहस्वप्ने साकारली आहेत.
व्यंकटेश लॉरेल सेंट्रल शिवाजीनगरमध्ये प्राईड हॉटेलजवळ स्थित असून शिवाजीनगर मेट्रो स्टेशन पासून अगदी एका मिनिटाच्या अंतरावर आहे. १.५ एकरात वसलेल्या या ३ व ४ BHK आलिशान अपार्टमेंट्सच्या प्रकल्पात २० पेक्षा जास्त अत्याधुनिक सुखसुविधा आहेत. शहराच्या मध्यभागात असल्याने महत्वाच्या ठिकाणांपासून उत्तम कनेक्टीव्हीटीचे सुख इथे अनुभवता येते. सर्वोत्तम लक्झरी देऊ करणाऱ्या या अपार्टमेंट्समध्ये संपन्न जीवनशैलीसाठी मुबलक जागा आहे.
व्यंकटेश लॉरेलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उत्कर्ष गुप्ता (झोनल हेड, आय. सी. आय. सी. आय. बँक), अरविंद मोकाशी (सी. जि. एम., एस. बी आय. – निवृत्त), सतीशदादा मगर (क्रेडाई इंडियाचे माजी अध्यक्ष आणि मगरपट्टा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक), कुमारभाऊ गोसावी, उमेश पाटील, अंकुश आसबे (व्यंकटेश बिल्डकॉनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक), एस. आर. कुलकर्णी (एम. बी. व्ही. ए. चे संस्थापक अध्यक्ष), किशोरराजे निंबाळकर (एम. पी. एस. सी. चे माजी अध्यक्ष) आणि लहुराज आसबे (व्यंकटेश बिल्डकॉनचे कार्यकारी संचालक) या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या विशेष प्रकल्पाचे महत्त्व द्विगुणित झाले.



