Sukrut Deo : सुरुवातीला हसले नंतर मिळाली टाळ्यांची दाद! सुकृर्तचा हार्ट-टचिंग परर्फॉर्मन्स व्हायरल, 8 वर्ष केला संघर्ष
Sukrut Deo : तो सादरीकरण करण्यासाठी आला त्यावेळी उपस्थित असणारे हसले पण त्याची कला पाहून हसणाऱ्यांनी नंतर टाळ्याच्या रुपाने त्याच्या सादरीकरणाला दाद दिली.

Sukrut Deo : एका शोमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या एका व्हिडिओतील तरुण नेमका कोण याविषयी चर्चा सुरू झाली. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 2 मधील व्हायरल होणारा व्हिडिओ असून, या व्हिडिओत एक मराठी थिएटर आर्टिस्ट त्याची कला सादर करताना दिसतोय. तो सादरीकरण करण्यासाठी आला त्यावेळी उपस्थित असणारे हसले पण त्याची कला पाहून हसणाऱ्यांनी नंतर टाळ्याच्या रुपाने त्याच्या सादरीकरणाला दाद दिली.
सुकृत देव असं या तरुण आर्टिस्टचं नाव आहे. अनेक वर्ष थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या सुकृत देवला ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मुळे आता जगभरात ओळख मिळाली आहे. एका रात्रीत त्याचं नशिबचं बदललं आहे. त्याच्या सोशल मीडियावरील फॅालोअर्स संख्या झपाट्याने वाढली आहे. ते म्हणतात रातोरात स्टार होणं असचं काहीसं सुकृतबाबतीत घडलं आहे.
कोण आहे हा मराठमोळा सुकृत देव? (Sukrut Deo )
‘इंडियाज गॉट लेटंट’च्या दुसऱ्या सीझनमधील या परफॉर्मन्सनं सुकृतला रातोरात सोशल मीडियावर चर्चेत आणलं. काही मिनिटांच्या सादरीकरणातून तो देशभरात पोहोचला, पण त्या यशामागे अनेक वर्षांचा त्याचा संघर्ष दडलेला होता.
स्टेजवरील सादरीकरणानंतर कार्यक्रमातील सेलिब्रिटींनी त्याचं भरभरून कौतुक केलं. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांनी त्याच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं, तर स्टॅंडअप कॉमेडियन समय रैना यांनी “तू स्टार आहेस” असं म्हणत त्याला प्रोत्साहन दिलं. नंतर आलियानं सोशल मीडियावर त्याचा उल्लेख “लिजेंड” असा केला.
हेही वाचा : Raisins Benefits: तुम्हीही मनसोक्त मनुके खाताय? सावध व्हा… ९९ टक्के लोक रोज करतायत हीच चूक
या यशानंतर सुकृत देव एका रात्रीत प्रसिद्ध झाला. “कालपर्यंत मी ऑडिशन्ससाठी रांगेत उभा होतो, आज माझे व्हिडीओ लाखो लोक पाहत आहेत,” असं तो सांगतो. शो नंतर त्याचे जुने व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
खरंतर सुकृतचा अभिनयप्रवास लहानपणापासून सुरू झाला होता. आई नृत्यांगना आणि अभिनेत्री असल्यामुळे घरात कलाविश्वाचं वातावरण होतं. शालेय स्नेहसंमेलनांपासून त्याची रंगमंचाशी मैत्री झाली. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिक्षण घेत असताना त्यानं एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
अभिनयासाठी नोकरी सोडली (Sukrut Deo )
करोनाकाळात त्यानं ऑनलाइन थिएटर वर्कशॉप्समध्ये स्वतःला घडवलं. नंतर कॉर्पोरेट नोकरी करत असतानाही तो कंटेंट क्रिएशन आणि ऑडिशन्स करत राहिला. अखेर नोकरी सोडून त्यानं पूर्णवेळ अभिनयाचा मार्ग स्वीकारला. या निर्णयात त्याच्या कुटुंबाची साथ मोलाची दिली. आज सुकृत देव विविध प्रोजेक्ट्स, नाटकं आणि कंटेंट क्रिएशनमध्ये सक्रिय आहे.
लाखोंच्या घरात फॅालोअर्स (Sukrut Deo)
‘इंडिया गॉट टॅलेंट’ या शोमध्ये झळकण्यापूर्वी सुकृतचे इन्स्टाग्रामवर अवघे 7 हजार फॉलोअर्स होते. मात्र त्याच्या परफॉर्मन्सनंतर त्याचे फॉलोअर्स लाखोंमध्ये पोहोचले आहेत. फक्त प्रेक्षकच नाहीत तर सेलिब्रेटी देखील त्याचा अभिनय पाहून चक्कित झाले आहेत.
सुकृतच्या अभिनयावर आलिया फिदा (Sukrut Deo)
अभिनेत्री आलिया भट्ट आणि शरवरी त्यांच्या आगामी ‘अल्फा’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘इंडिया गॉट टॅलेंट’मध्ये पोहोचल्या होत्या. तिथे आलियानं सुकृतच्या अभिनयाचं कौतुक केलं. तू खरंच अभिनय करत होतास ना? असा प्रश्न आलियानं विचारला. मराठमोळ्या सुकृतवर आलिया अक्षरश: फिदा झाली. सुकृतने त्याच्या परफॉर्मन्सची एक क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यावर समय रैनाने कमेंट करत ‘स्टार’ म्हटलं.





