Latur News : नीट परीक्षा रद्द झाल्याच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या
गोंदेगाव येथील १८ वर्षीय विद्यार्थिनी मैथीली अशोक सोनवणे हिने आत्महत्या (Latur News) केल्याची दुर्दैवी घटना १६ मे रोजी उघडकीस आली.

Latur News : गोंदेगाव येथील १८ वर्षीय विद्यार्थिनी मैथीली अशोक सोनवणे हिने आत्महत्या (Latur News) केल्याची दुर्दैवी घटना १६ मे रोजी उघडकीस आली. नीट परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे ती मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती तिचे वडील अशोक सोनवणे यांनी गातेगाव पोलिसांना दिली आहे.
मैथीली ही अभ्यासू व महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनी होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील (Latur News) पेपर चांगले गेल्याने ती आशावादी होती.
मात्र, परीक्षा रद्द झाल्याच्या चर्चांमुळे व पुढे काय होणार याबाबतच्या चिंतेमुळे ती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती, असे कुटुंबीयांनी सांगितले.
१६ मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोंदेगाव शिवारातील स्वतःच्या शेतात तिने ओढणीच्या साहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास (Latur News) घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गातेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मैथीलीचे वडील हे गोंदेगावचे पोलीस पाटील आहेत. त्यांच्या जबाबानुसार, परीक्षेच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या तणावातून मैथीलीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. या घटनेमुळे गोंदेगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






