Latur Crime : जमिनीच्या वाटणीच्या वादातून हृदय पिळवटून टाकणारी घटना चाकूर येथे (Latur Crime) उघडकीस आली आहे. एका चुलतीने स्वतःच्या एकुलत्या एक ७ वर्षांच्या पुतण्याचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. रविवारी सकाळी जुने महादेव मंदिर परिसरातून दोन चुलत भाऊ साईचरण दिनेश स्वामी (१०) आणि देवांश मंगेश स्वामी (७) हे अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी (Latur Crime) सर्वत्र शोध घेतल्यानंतर दुपारी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. दुपारी सुमारे २.१० वाजता देवांशचा मृतदेह चाकूर-उजळंब रोडलगत एका मोकळ्या जागेत आढळून आला. पोलिसांनी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने चौकशी केली. श्वान पथकाच्या मदतीने संशयाची दिशा घराकडेच वळली. Latur Crime चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. देवांशची चुलती अनिता दिनेश स्वामी (३४) हिनेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून संतापाच्या भरात तिने देवांशचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या मुलालाही बेपत्ता दाखवून संशय टाळण्याचा (Latur Crime) प्रयत्न केल्याचे उघड झाले. दरम्यान, साईचरण हा रात्री उशीरा लातूर येथे सुरक्षित अवस्थेत सापडला.