Latur : राष्ट्रीयकृत बॅंकेची 22 कोटींची फसवणूक; महसूल विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक

लातूर – महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका राष्ट्रीयकृत बॅंकेची 22.87 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणात तक्रारदार तहसीलदार महेश परांडेकर यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान या जलसंधारण प्रकल्पांतर्गत जमा झालेला निधी महसुल विभागाच्या दोघा कर्मचाऱ्यांनी बॅंकेची फसवणूक करून काढून घेतल्याचा प्रकार निदर्शनाला आला. त्यानंतर रितसर तपास करून या दोघांना अटक करण्यात आली.
तहसीलदारांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रविवारी महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/hc-grants-bail-to-ex-maha-minister-anil-deshmukhs-former-secretary/
सुरूवातीला जलयुक्त शिवाराच्या निधीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीला आल्यानंतर या साऱ्या निधीचे रितसर ऑडिट करण्यात आले त्यावेळी एकूण 22 कोटी 87 लाख रूपयांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले होते.





