हैद्राबाद प्रकरणाच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेसच्या वतीने ‘लाठी’ आंदोलन
Updated On:

पुणे – हैद्राबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करून तिला पेटवण्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली आता ‘बांगड्या नाही तर लाठी’ आंदोलन केले आहे.
हैद्राबाद पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा व अशा क्रूर मानसिकतेला ठेचाण्यासाठी महिलांनाच आता तलवार हाती घ्यावी लागेल, हा संदेश देण्यासाठी शहर महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.





