Pune District : निमगाव सावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटला
Pune District : जिल्हा परिषद सदस्या यांच्या निधीतून आणि आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. बोअरवेलच्या कामाची पाहणी करण्यासाठी कल्पना काळे यांनी नुकतीच शाळेला भेट दिली.

बेल्हे : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना होणारी ही अडचण लक्षात घेऊन बोरी-खोडद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कल्पना वैभवकुमार काळे यांच्या माध्यमातून शाळेसाठी बोअरवेलचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्या यांच्या निधीतून आणि आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. बोअरवेलच्या कामाची पाहणी करण्यासाठी कल्पना काळे यांनी नुकतीच शाळेला भेट दिली.
या वेळी पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेगर, आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत जावळे, गणपत घोडे गुरुजी, चंदा गाडगे, गणेश गाडगे (होमगार्ड), सामाजिक कार्यकर्ते किरण गोत्राळ, मच्छिंद्र घोडे, दीपक गाडगे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महम्मदहनीफभाई पटेल उपस्थित होते.
तसेच शाळेतील शिक्षक बाळासाहेब राजगुरू, शोभा गोंदके, दत्ता हाडवळे, प्रभाकर गुंजाळ, संतोष वाघोले, पुष्पा साके, सुनील गहिने व अजित गाडगे उपस्थित होते. शाळेसाठी बोअरवेलची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने शिक्षक बाळासाहेब राजगुरू व प्रभाकर गुंजाळ यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.





