Pune District : दुर्बिणीद्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू
Pune District : दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी त्रास होतो आणि रुग्ण वेगाने पूर्ववत होतो. या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झालेल्या या सुविधेमुळे ग्रामीण भागातील महिलांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज उरलेली नाही.

भिगवण : भिगवण येथील ग्रामीण रुग्णालयात एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. ही आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर पुन्हा सुरू झाल्याने भिगवणसह परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी त्रास होतो आणि रुग्ण वेगाने पूर्ववत होतो. या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झालेल्या या सुविधेमुळे ग्रामीण भागातील महिलांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज उरलेली नाही.
इंदापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष शिबिर राबविण्यात आले. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन विभुते, शस्त्रक्रिया करणारे डॉ. माधवराव नाईक-निंबाळकर तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वृषाली नवगिरे, जया गायकवाड, शीतल अरगुडे, स्वप्निल कदम, जया कदम यांच्यासह भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि शेटफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. भविष्यातही अशा अत्याधुनिक वैद्यकीय सेवा नियमितपणे उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. या वेळी जावेद शेख, तुषार क्षीरसागर, सनी शेलार, अरमान शेख, महेश आगवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.”
-मुमताज जावेद शेख, माजी उपसरपंच, भिगवण.





