Katrina Kaif : आई झाल्यानंतर पहिल्यांदा दिसली कतरिना; व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Katrina Kaif : गरोदरपणानंतर कतरिनाचे वजन वाढलेले असल्याचा दावा केला जात आहे. यावरुन काही युझर्सनी तिच्या दिसणावरुन टीका केली आहे.

Katrina Kaif : सोशल मीडियाच्या युगात सेलिब्रिटींच्या दिसण्यावर आणि वाढलेल्या वजनावरून अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफलाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसलेल्या कतरिनाच्या बदललेल्या लूकवरून काही सोशल मीडिया युझर्सनी तिला लक्ष्य केले आहे.
कतरिना कैफ नुकतीच पती विकी कौशलसोबत मुंबईत चित्रपट निर्माता कुकू कोहली यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिली होती. यावेळी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गरोदरपणानंतर कतरिनाचे वजन वाढलेले असल्याचा दावा केला जात आहे. यावरुन काही युझर्सनी तिच्या दिसणावरुन टीका केली आहे.
स्मशानभूमीतील तिचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर काही ट्रोलर्सनी अभिनेत्रीच्या लूकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या. समोर आलेल्या एका व्हिडिओत कतरिना आपल्या पतीचा हात धरून जाताना दिसत आहेत. यावेळी दोघांनी साध्या पद्धतीचे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. एका युझरने, “कतरिनाला काय झाले आहे?” अशी टिप्पणी केली, तर दुसऱ्याने तिला ‘रसगुल्ल्यासारखी दिसते’ असे म्हणत तिच्या दिसण्यावरुन आक्षेपार्ह टीका केली आहे.
View this post on Instagram
आई झाल्यापासून कतरिना प्रसिद्धीच्या झोतातून काहीशी दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असली, तरी मुलगा आणि वैयक्तिक आयुष्यामुळे तिचा सार्वजनिक वावर समित झाला आहे.
कतरिना कैफने आणि विकी कौशलच्या आयुष्यात नवा पाहुण्याचे आगमन झाले आहे. ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी अभिनेत्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर ती पहिल्यांदाच अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात दिसली. कतरिना आणि विकी कौशल यांचा ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये एका पॅलेसमध्ये मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला.





