Kareena Kapoor : करीनाचा नो मेकअप लुक! व्हेकेशनचा आनंद लुटतानाचे फोटो केले शेअर
Kareena Kapoor : सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तिने व्हेकेशन टूरदरम्याचे काही फोटो इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या दमदार अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर करीना सतत सक्रिय असते. या माध्यमातून ती नेहमी चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते.
सध्या ती कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तिने व्हेकेशन टूरदरम्याचे काही फोटो इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधा पण आकर्षक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Kareena Kapoor)
करीनाने पांढरा शर्ट, डोक्यावर स्टायलिश स्कार्फ आणि जाड काळ्या फ्रेमचा चष्मा परिधान केला आहे. साधेपणातही तिचा आत्मविश्वास आणि ग्लॅमरस लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये करिनाने, “तुम्ही पाहू शकता, मला हा टाय खूप आवडतोय.” असे म्हटले आहे. (Kareena Kapoor)
View this post on Instagram
करीनाच्या नैसर्गिक लूकचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि मेकअपशिवाय फोटो शेअर करण्याच्या धाडसाचे स्वागत केले आहे.
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, “हे धाडस फक्त बेबोच करू शकते. या फोटोंमुळे कलाकारांनाही सामान्य माणसांप्रमाणेच नैसर्गिक त्वचा असते, हे दिसून येतं.” असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
करीनाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून, तिचा साधा आणि नैसर्गिक अंदाज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
तीन चित्रपटांचे काम सुरू (Kareena Kapoor)
करीनाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या आगामी दायरा चित्रपटात ती दिसणार आहे. याशिवाय वीरे दी वेडिंग २ आणि क्रू २ या चित्रपटावर काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते. या दोन्ही चित्रपटातील करीनाच्या भूमिकेची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
हेही वाचा : Bali Trip: 1 लाखात होईल का बाली ट्रिप? दोघांसाठी किती खर्च येतो, जाणून घ्या संपूर्ण हिशेब





