लता मंगेशकरांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, थेट व्हेंटिलेटरवर हलवले

मुंबई – ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या गान कोकिळा आणि भारतरत्न ‘लता मंगेशकर’ यांच्या प्रकृती बद्दल महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, आता त्या करोना आणि न्यूमोनियातून बऱ्या झाल्या आहेत. असं सांगितलं आहे. मात्र . मात्र आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत.
आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं.
92 वर्षीय लता मंगेशकर यांना करोनाची बाधा झाल्यामुळे 9 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात होते. लता दीदी पहिल्या दिवसापासूनच आयसीयूमध्ये उपचार घेत होत्या. मात्र, त्यांच्या तब्येतीत सुधारणा पाहायला मिळाल्यानंतर त्यांचं व्हेंटीलेटर सपोर्टही हटवण्यात आलं होत. असं रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी काल (दि. 30) सांगितले होते.





