Lashkar Commander Yasir Killed : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर यासिर याचा खात्मा; काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना (Lashkar Commander Yasir Killed) मोठे यश मिळाले आहे.

Lashkar Commander Yasir Killed : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना (Lashkar Commander Yasir Killed) मोठे यश मिळाले आहे. बडगाम जिल्ह्यातील युसमर्गच्या उंचावरील अशदार गली परिसरात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी कमांडर यासिर याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याची ओळख पाकिस्तानी नागरिक आणि लष्कर-ए-तोयबाशी (Lashkar Commander Yasir Killed) संबंधित दहशतवादी म्हणून केली आहे. ही कारवाई ऑपरेशन अशदार अंतर्गत करण्यात आली. विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी अशदार गली परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली होती.
परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात यासिर मारला गेला. सुरुवातीला चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नव्हती.
मात्र, तपासानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याची ओळख यासिर या पाकिस्तानी नागरिकाच्या रूपात केली. तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेही त्याच्या ओळखीची पुष्टी केली आहे. यासिरचा खात्मा हा सुरक्षा दलांसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण तो जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
चकमकीनंतर सुरक्षा दलांनी (Lashkar Commander Yasir Killed) परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू ठेवली आहे. आणखी एक ते दोन दहशतवादी जंगल परिसरात लपून बसल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे. त्यामुळे अशदार गली आणि आसपासच्या घनदाट जंगलांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. युसमर्ग परिसर हा उंच पर्वतीय आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरत आहे. सुरक्षा दलांकडून परिसरातील प्रत्येक भागाची बारकाईने तपासणी केली जात आहे.






