मणिपूरच्या आर्मी कॅम्पजवळ भू्स्खलन, 7 मृतदेह बाहेर काढले, 30 ते 40 जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले

नवी दिल्ली , वृत्तसंस्था
मणिपूर मध्ये मागच्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे भूस्खलन झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. नोनी जिल्ह्याच्या तुपूल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली असून या भूस्खलनात तब्बल 107 टेरिटोरिअल जवान सापडल्याची भीती आहे. त्यापैकी ३० ते ४० जवान मातीखाली दाबले गेले आहेत. आतापर्यंत ७ जवानांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत.
Noney, Manipur | Massive landslide triggered by incessant rains caused damage to Tupul station building of ongoing Jiribam – Imphal new line project. Landslide also stuck the track formation, camps of construction workers. Rescue operations in progress: NF Railway CPRO pic.twitter.com/5fzxzQcCki
— ANI (@ANI) June 30, 2022
मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी तात्काळ मिटिंग बोलावली असून जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांची चमू पाठविण्यात आली आहे. आसाम आणि मणिपूरसह पूर्वोत्तर राज्यात पावसामुळं पूरपरिस्थिती आहे. आसाममध्ये दहा दिवसांत सुमारे 135 लोकांचा पुरामुळं बळी गेलाय. हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे.
"Visited Tupul to take stock of unfortunate landslide situation. I’m thankful to Hon’ble HM Shri Amit Shah Ji for calling me to assess the situation & assured all possible assistance. A team of NDRF has already reached site for rescue operation," tweets CM Manipur, N Biren Singh pic.twitter.com/przrK9gp9L
— ANI (@ANI) June 30, 2022
सैनिकांसोबतच काही नागरिकही या मातीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शक्यता आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी नोनी आर्मी मेडिकलचे युनिट आणण्यात आले आहे. वातावरणातील बिघाडामुळं शोध मोहिमेत अडचण येत आहे. सेनेचा हेलिकॅप्टरही घटनास्थळी पोहचला आहे.
मातीच्या ढिगाऱ्यामुळं ईजाई नदी ब्लॉक झाली आहे. नदीतील पाणी साचल्यामुळं तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा ढिगारा फुटल्यास खालच्या भागात मोठं नुकसान होऊ शकते. सध्या बचावकार्य सुरू आहे. पण, वातावरणामुळं त्यात अडचण येत आहे.



