बिहार निवडणुकांपूर्वी लालू यादवांची डोकेदुखी वाढली; तेज प्रताप यांनी केली नव्या पक्षाची स्थापना

Tej Pratap Yadav | बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. एक राजकीय पाऊल त्यांचे थोरले पुत्र तेजप्रताप यांनी उचलले आहे. त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. तेज प्रताप यांच्या नवीन पक्षाचे नाव ‘जनशक्ती जनता दल’ असे आहे
तेजप्रताप यांच्या अयोग्य वर्तनामुळे त्रस्त झालेल्या लालूंनी काही दिवसांपूर्वी त्यांची राजदमधून हकालपट्टी केली. त्यानंतर तेजप्रताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आता आणखी पुढे जात त्यांनी जनशक्ती जनता दल हा पक्ष स्थापन केला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे वाटप देखील केले आहे. तेज प्रताप यांच्या पक्षाला ब्लॅक बोर्ड हे चिन्ह देण्यात आले आहे.
तेज प्रताप यांनी पक्षात सामील होण्यासाठी संपर्क मोबाइल नंबर देखील शेअर केला आहे. सोबतच त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, त्यांचा पक्ष बिहारच्या संपूर्ण विकासासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यांचा उद्देश बिहारमध्ये संपूर्ण बदल घडवून नवीन व्यवस्था निर्माण करणे आहे. यासाठी दीर्घ राजकीय लढाई लढण्यास तयार असल्याचे देखील तेज प्रताप यादव यांनी म्हंटले आहे. याद्वारे तेज प्रताप यादव यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एका नवीन पक्षाद्वारे त्यांची राजकीय कारकीर्द पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. Tej Pratap Yadav |
हमलोग बिहार के संपूर्ण विकास के लिए पूर्ण रूप से समर्पित और तत्पर हैं। हमारा मकसद बिहार में संपूर्ण बदलाव कर एक नई व्यवस्था का नव निर्माण करना है।
हमलोग बिहार के संपूर्ण विकास के लिए लंबी लड़ाई लड़ने को तैयार हैं।#tejpratapyadav #janshaktijantadal #biharelection pic.twitter.com/GxsQHw0WqQ
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) September 25, 2025
सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले वादात
तेज प्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय जनता दलातून केली. अलीकडेच एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना पक्षातून बाहेर करण्यात आले. तेज प्रताप यादव यांचे अनुष्का यादव यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता.
नंतर त्यांनी आपले सोशल मीडिया खाते हॅक झाल्याचा दावा केला आणि ती पोस्ट डिलीट केली. तेज प्रताप यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत. ते अनेकदा त्यांचे धाकटे भाऊ तेजस्वी यादव यांच्याशी मतभेदांमुळे चर्चेत राहिले आहेत. Tej Pratap Yadav |
हेही वाचा:





