लालू प्रसाद यादव यांच्या मुलासह मुलींच्या अडचणीत वाढ; बिहार, दिल्लीत ईडीचे छापे

नवी दिल्ली : बिहारमधील राजदच्या अडचणी कमी होण्याचे काही नाव घेत नाहीत. कारण जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने लालू प्रसाद यादव यांच्या दिल्लीतील मुलींचे निवासस्थान, बिहारमधील आरजेडीच्या माजी आमदारांच्या १५ ठिकाणांवर आणि गुरुग्राममधील एका खासगी बिल्डरच्या कार्यालयावर छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या अगोदर पाटणा येथील सीबीआय पथकाने जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी केली होती. त्याचवेळी दिल्लीत आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी आज ईडीची टीम कारवाईत आहे.
Bihar | Central agencies conduct a raid at ex-RJD MLA Syed Abu Dojana’s premises in Patna.
— ANI (@ANI) March 10, 2023
पाटण्यातील न्यू फ्रेंड्स कॉलनी भागातील उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी ईडीचे पथक पोहोचले आहे. त्याचवेळी ईडीने आरजेडीचे माजी आमदार अबू दोजाना यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या दिल्लीतील मुली आणि गुरुग्राममधील एका बिल्डरच्या कार्यालयावर छापेमारी सुरू आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉब फॉर जॉब घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी आमदार अबू दोजाना यांच्या 15 ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. एवढेच नाही तर फुलवारी शरीफ येथील अबू दोजानाच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात येत आहेत. या प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीयही आरोपी आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या मुलींच्या दिल्लीतील निवासस्थानावरही छापे टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीचे पथक गुरुग्राममधील एका खासगी बिल्डरच्या कार्यालयातही पोहोचले आहे.




