Lalu Prasad Yadav : “लालूप्रसाद यादव हे दुसरे भगवान शिव…”; महिला आमदाराचे वादग्रस्त विधान

Lalu Prasad Yadav | Urmila Thakur – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे देव आहेत असा दावा पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच करत असतात पण आता त्यांची तुलना चक्क भगवान भोलेनाथांशी केली जाते आहे. पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार उर्मिला ठाकूर यांनी मुझफ्फरपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाल्या की जर भगवान शिवानंतर दुसरा शिव कोणी असेल तर ते लालू प्रसाद यादव आहेत.
उर्मिला ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की खऱ्या अर्थाने, जर कलियुगाचा कोणी देव असेल तर तो बाबा भीमराव आंबेडकर होते, ज्यांनी आपल्याला अधिकार दिले आणि ते अंमलात आणण्याचे काम केले. तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लालू प्रसाद यादव आहे, ज्यांच्या दरबारात भगवान शिवाप्रमाणे प्रत्येकाचे स्थान आहे. कोणालाही अपमानित केले जात नाही.
उर्मिला ठाकूर पुढे म्हणाल्या की ज्याप्रमाणे आजपर्यंत मर्यादा पुरुषोत्तम रामाचे स्थान कोणीही घेतलेले नाही, त्याचप्रमाणे भगवान कृष्णाचे स्थान कोणीही घेतलेले नाही. कबीरचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे अनेक आमदार, मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती निवडून आले आहेत, पण लालूप्रसाद यादव यांची जागा कोणीही घेतलेली नाही आणि कोणीही घेणार नाही. भगवान शिव हे आपल्या गरीबांचे देव आहेत व त्यांच्यानंतर आंबेडकर आलेत आणि त्यांच्यानंतर जर दुसरा भगवान शिव असेल तर ते लालूप्रसाद यादव आहे.
दरम्यान, उर्मिला ठाकूर यांच्या विधानावर भाजप प्रवक्ते प्रभाकर मिश्रा म्हणाले की, तिकीट मिळवण्यासाठी अनेक लोक लालू यादव यांची स्तुती करत आहेत. पूर्वी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होत होती. आता या आमदाराने त्यांची तुलना भगवान भोलेनाथांशी केली आहे, जी केवळ मूर्खपणाच नाही तर सनातन धर्माचा अपमान आहे. जर लालू देव आहेत तर ते त्यांच्या घरात त्यांचे मंदिर का बांधत नाहीत.





