ललित प्रभाकरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; इमरान हाश्मीसोबत करणार काम

Ground Zero Trailer Launch | बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असणारा ‘ग्राउंड झीरो’ चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर ७ एप्रिल रोजी रिलीज झाला. विशेष म्हणजे या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्याची देखील एन्ट्री झाली आहे. तो म्हणजे ललित प्रभाकर. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याची खास झलक देखील पाहायला मिळाली आहे.
नुकतीच ललित प्रभाकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्याने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. ललितने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, माझा पहिला हिंदी चित्रपट. या पदार्पणाचा खूप आनंद होत आहे. या संधीसाठी @excelmovies चे खूप खूप आभार आणि सतत प्रयत्नांसाठी @dcatalent चे सुद्धा मनापासून आभार. दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांच्यासोबत काम करुन छान वाटलं…” अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
‘ग्राउंड झीरो’ हा चित्रपट येत्या २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून हा एक सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. २००१ साली काश्मीरमधील एका सीक्रेट मिशनवर आधारित हा सिनेमा आहे. Ground Zero Trailer Launch |
बीएसएफचे डेप्युटी कमांडंट नरेंद्र नाथ दुबे यांनी या मिशनचे नेतृत्व केले होते असून, या भूमिकेत इमरान हाश्मी आहे. तर सई सिनेमात बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारत असून, ललित त्यांच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही मराठमोळा दिग्दर्शक तेजस देऊस्करने केले आहे. Ground Zero Trailer Launch |
हेही वाचा :





