Lalbaug cha Raja : हा भेदभाव का? लालबागच्या राजाचे VIP दर्शन बंद करा.! मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी

मुंबई – मुंबईसह (mumbai) देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या (Lalbaug cha Raja) दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राज्याच्या (Lalbaug cha Raja) दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाचा पाचवा दिवस असल्याने आजही राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी आहे. तर राज्याच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांना तासन् तास राज्याच्या दर्शनासाठी प्रतिक्षेत आहे. गर्दीमुळे भक्तांची लालबागच्या (Lalbaug cha Raja) सभामंडपात मोठी गैरसोयदेखील होत असल्याचं दिसून येत आहे.
तर दुसरीकडे व्हीआयपींना रेडकार्पेट अथरून दर्शन दिले जात आहे. हा भेदभाव अयोग्य असून लालबागचा राजाचे व्हिआयपी दर्शन बंद करा अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे. मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गणेशभक्त चोवीस-चोवीस तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेत आहेत तर दुसरीकडे खास व्यक्तींना व्हिआयपीच्या नावाखाली थेट लालबाग राजाच्या पाया जवळ नेऊन दर्शन दिले जात आहे. हा भेदभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नुकतंच बिग बॉस फेम ‘उर्फी जावेद’ला व्हिआयपी च्या नावा खाली थेट श्रीच्या चरणी दर्शनाला नेण्यात आले. उर्फी चे समाजासाठी आणि देशासाठी काय योगदान आहे? याचे उत्तर व्यवस्थापकांनी द्यावे. ही दर्शनाला रांग लावलेल्या गणेश भक्तांची थट्टा आहे.
डबेवाल्यांची मुंबईसाठी थोडे का होईना योगदान निश्चित आहे. जर डबेवाला कामगार राजाच्या दर्शनास आला तर मंडळ त्यांना व्हिआयपी दर्शन देईल का? असा सवाल सुभाष तळेकर यांनी विचारला आहे.
एक गणेशभक्त दर्शनासाठी रांगेत चोविसतास उभा राहतो मात्र व्हिआयपी गणेशभक्त थेट श्रीच्या चरणी जातो हा भेदा-भेद लालबागचा राजा मंडळाने बंद करावा. असं देखील ते यावेळी म्हणाले.





