पुणे जिल्हा | लाला सर्वसामान्यांची बँक: 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

नारायणगाव, (वार्ताहर)- लाला बँक सर्वसामान्य जनतेची बँक असून बँकेचा अनेक उद्योजक व व्यापारी ग्राहकांना फायदा झाला आहे. बँकेने आज अखेर शून्य टक्के एनपीए राखल्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे प्रतिपादन जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे यांनी प्रतिपादन केले.
बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली लाला बँकेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जयहिंद मंगल कार्यालय येथे पार पडली त्यावेळी अॅड. काळे बोलत होते.
अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी नफा विभागणीचा ठराव मंजूर झाल्यावर सभासदांच्या खात्यात 10 टक्के दराने लाभांश ऑनलाइन पद्धतीने जमा केल्याने सभासदांनी आनंद व्यक्त केला.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने बँकेला शून्य टक्के एनपीए पुरस्कार मिळाला असल्याचे सांगितले. यावेळी सभासदांच्या वतीने टी.आर. वामन यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
सभासदांचे स्वागत अलाला बँकेचे संचालक अशोक गांधी यांनी, प्रास्ताविक अॅड. निवृत्ती काळे यांनी, मागील इतिवृत्ताचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद निसाळ यांनी, सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी तर मंगेश बाणखेले यांनी आभार मानले
आर्थिक परिस्थिती
ठेवी 470 कोटी
2027 पर्यंत एक हजार कोटी ठेवी पार पाडण्याचा मानस
कर्जवाटप 310 कोटी
भाग भांडवल 17 कोटी 70 लाख
लाला बँकेचे मोबाईल बँकिंग अॅप लवकरच ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध होणार
उत्कृष्ट शाखा म्हणून आळेफाटा शाखेचा सन्मान





