महिन्याभरापासून बारामती-पुणे मार्गावर लाल परी, हिरकणी बस धावणे बंद; खासदार सुप्रिया सुळेंनी पोस्ट लिहित केली मागणी म्हणाल्या…

Baramati: गेल्या काही दिवसांपासून बारामती-पुणे या मार्गावर हिरकणी आणि लाल परी या गाड्या सोडल्या जात नसल्याने यामुळे याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुणे बारामती विना थांबा या बसेस या मार्गावर धावत आहेत. मात्र, लाल परी आणि हिरकणी या बसेस देखील धावणे गरजेचे आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी एसटी प्रशासनाला या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. याविषयी त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंवरून पोस्ट शेअर केली आहे.
एसटीच्या माध्यमातून बारामती-पुणे या मार्गावर विना वाहक-विना थांबा बससेवा दिली जाते. परंतु गेली काही महिन्यांपासून या मार्गावर हिरकणी अथवा लाल परी या गाड्या सोडल्या जात नाहीत. याऐवजी फक्त शिवशाही गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांचे तिकीट दर जास्त आहेत. यामुळे या मार्गावर हिरकणी आणि लाल परी या बसेस देखील सोडण्यात याव्यात असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
एसटीच्या माध्यमातून बारामती-पुणे या मार्गावर विना वाहक-विना थांबा बससेवा दिली जाते. परंतु गेली काही महिन्यांपासून या मार्गावर हिरकणी अथवा लाल परी या गाड्या सोडल्या जात नाहीत. याऐवजी फक्त शिवशाही गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांचे तिकीट दर जास्त आहेत. शिवाय त्यातील बऱ्याच गाड्या…
— Supriya Sule (@supriya_sule) March 16, 2025
बऱ्याच गाड्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे त्या अनेकदा रस्त्यातच बंद देखील पडतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. एसटी महामंडळाला माझी विनंती आहे की कृपया नागरीकांच्या सेवेसाठी या मार्गावर हिरकणी व लाल परी या गाड्या विना वाहक-विना थांबा या सेवेअंतर्गत पुन्हा सुरू कराव्यात. तसेच नादुरुस्त शिवशाही बसेस या मार्गावर सोडल्या जाऊ नये, अशी मागणी देखील त्यांनी या पोस्टमध्ये केली आहे.





