Lakshya Sen Champion : लक्ष्य सेनचा जपानमध्ये ऐतिहासिक पराक्रम! ‘कुमामोटो मास्टर्स’ जिंकणारा ठरला पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू
Lakshya Sen Champion : भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने कुमामोटो मास्टर्स जपान ओपनच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचला आहे, आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

Lakshya Sen Wins Kumamoto Masters 2026 Title Beats Koki Watanabe First Indian Champion : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जपानमध्ये ऐतिहासिक पराक्रम करत २०२६ मधील आपले सलग दुसरे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर जेतेपद पटकावले आहे. कुमामोटो मास्टर्सच्या थरारक अंतिम सामन्यात लक्ष्यने स्थानिक खेळाडू कोकी वातानाबेचा तीन सेट्सपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २-१ असा पराभव केला. या दणदणीत विजयासह लक्ष्य सेन कुमामोटो मास्टर्सचे विजेतेपद जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला असून, एकाच हंगामात दोन वर्ल्ड टूर जेतेपदे जिंकण्याची त्याच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे.
पहिला सेट १३-२१ ने गमावला; पण पुढील दोन्ही सेट्समध्ये लक्ष्यचे वादळ
अंतिम सामन्यात लक्ष्यची सुरुवात निराशाजनक झाली आणि पहिल्या सेटमध्ये त्याला १३-२१ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर लक्ष्यने अद्भुत संयम आणि चपळाई दाखवत चुका टाळल्या आणि दुसरा सेट २१-१८ ने जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने वातानाबेला कोणतीही संधी न देता २१-१४ असा एकतर्फी विजय मिळवत अवघ्या ६४ मिनिटांत जेतेपदावर नाव कोरले.
‘स्वतःवर विश्वास ठेवला आणि संघर्ष सुरूच ठेवला’; लक्ष्यची प्रतिक्रिया
🇮🇳 Historic Campaign – The Legend of Lakshya Grows 🔥
Lakshya Sen becomes the first Indian to win the Kumamoto Masters Japan!
Sen beat Koki Watanabe in the 2026 final 13-21, 21-18, 21-14 with his trademark comeback!
Congratulations on the back-to-back BWF Super 500 titles, Lakshya 🏆🏆
Let’s cheer for our champion in the comments with some ♥️
📸: @badmintonphoto
#Kumamoto #kumamotomasters
— BAI Media (@BAI_Media) November 15, 2026
ऐतिहासिक विजयानंतर लक्ष्य म्हणाला, “अनेक सामन्यांत पहिला सेट गमावूनही मी आत्मविश्वास डळमळीत होऊ दिला नाही आणि संघर्ष सुरूच ठेवला. गेल्या वर्षी मी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलो होतो; यंदा त्यापेक्षा सरस कामगिरी करून विजेतेपद पटकावल्याचा खूप आनंद आहे.”
वर्ल्ड टूर फायनल्सची दावेदारी झाली भक्कम; मिळाले ९२०० रँकिंग गुण
Another glorious moment for Indian Badminton! 🇮🇳🏸
Heartiest congratulations to Lakshya Sen on clinching his second consecutive BWF Super 500 title at the Kumamoto Masters Japan 2026. https://t.co/71Wt67JfV2
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) November 15, 2026
कुमामोटोमधील या ऐतिहासिक विजयामुळे लक्ष्यला तब्बल ९२०० रँकिंग गुणांची कमाई झाली आहे. यासह हांगझोऊ येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स २०२६ साठी पात्र ठरण्याची त्याची दावेदारी अधिक भक्कम झाली आहे.





