satara | लक्ष्मी नारायण व सावित्रीबाई फुले कन्याशाळेची निकालाची परंपरा कायम

खटाव, (प्रतिनिधी) – खटाव ता. खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल व सावित्रीबाई फुले कन्याशाळेने देखील उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 98.48 टक्के लागला आहे. विद्यालयातील एकूण 132 विद्यार्थी बसले होते.
त्यापैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक असे आहेत. करण दीपक शिंदे – 92.40 टक्के, वैष्णवी विठ्ठलराव बोटे – 91.60 टक्के, शुभम नवनाथ फडतरे- 90.60 टक्के. तर याच संस्थेच्या सावित्रीबाई फुले कन्याशाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 93.33 टक्के लागला. परीक्षेसाठी एकूण 15 विद्यार्थी बसले होते.
एक विद्यार्थी गैरहजर असल्यामुळे चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. निशा विजयकुमार शिंदे – 82 टक्के, वैष्णवी पंढरीनाथ जगताप – 79.20 टक्के, अनुष्का दादासो बाबर – 72.60टक्के,.
चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजितराव पाटील, श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एल. डी. पोडफोडे, सावित्रीबाई फुले कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पा सवाखंडे, पदाधिकारी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी -विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.





