लखीमपुर घटनेवर उद्या सुप्रिम कोर्टात सुनावणी
Updated On:

नवी दिल्ली, – लखीमपुरच्या घटनेवर उद्या बुधवारी सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. लखीमपुरला शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चार शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याची घटना घडली आहे त्या प्रकरणात उत्तरप्रदेश सरकारच्या गलथान भूमिकेवर सुप्रिम कोर्टाने जोरदार ताशेरे मारले आहेत.
या घटनेची न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी करावी आणि त्यात सीबीआयलाही सामील करावे अशी मागणी दोन वकिलांनी सुप्रिम कोर्टात केली आहे त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. या घटनेत एकूण आठ जण ठार झाले असून त्यातील तीन जण शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ठार झाले आहेत.
यातील प्रत्येक मृतांच्या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्या अनुषंगाने राज्य सरकारने उपाययोजना केली पाहिजे अशी सूचनाही सुप्रिम कोर्टाने या आधीच केली आहे.





