लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधत साजरे केले रक्षाबंधन

इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील मौजे लाखेवाडी गावच्या आदर्श सरपंच चित्रलेखा श्रीमंत ढोले यांनी,आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत वेगळा आदर्श निर्माण करीत,ग्रामपंचायतचे काम करणारेे कर्मचारी,ग्रामपंचायत सदस्य तसेच व गावाला सेवा देणारे शासकीय अधिकारी यांना राखी बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
लाखेवाडी येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच जय भवानीगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या निवासस्थानी (सोमवारी १९ ऑगस्ट) रोजी,सरपंच चित्रलेखा श्रीमंत ढोले यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांना राख्या बांधत शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच चित्रलेखा ढोले म्हणाल्या की,आपल्या गावची सेवा रात्रंदिवस करणारे कर्मचारी,खऱ्या अर्थाने गावचे भूषण असतात.त्यांना देखील प्रत्येक सणाचा आनंद मिळाला पाहिजे. हा हेतू गावच्या प्रमुखांचा असतो.
गाव हेच कुटुंब म्हणून काम करण्याची भूमिका कायम ठेवल्याने,सरपंच म्हणून काम करताना मनोमन आनंद वाटतो.राज्याचे माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकासात्मक कायापालट वेगाने होऊ लागला आहे. यामध्ये गावकरी मनोमन साथ देत आहेत.रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने माझे कर्मचारी बांधव यांच्यासमवेत रक्षाबंधन सण साजरा केल्याने,आपलेपणा जपण्यास ऊर्जा मिळणार आहे अशी ही प्रतिक्रिया लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी पत्रकारांना दिली.





