नवी दिल्ली: अभिनेता सुशातसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरी गेली.
दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सज्ज झाला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस बिहार सरकारकडून करण्यात आली. ती केंद्र सरकारने स्वीकारली.
सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा करणारी अधिसूचनाही केंद्र सरकारने जारी केली. त्यानंतर तपासाची सुत्रे हाती घेणार असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली.
यातच सीबीआयचं एक विशेष पथक या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पथकामध्ये मुजफ्फरपूरच्या आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर यांचाही समावेश आहे.
आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर
– २००४ सालच्या गुजरात कॅडरच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलंय.
– मागील दीड वर्षापासून त्या सीबीआयमध्ये काम करत आहेत. अनेक मोठ्या आणि चर्चेत असलेल्या घोटाळ्यांसह हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपाससुद्धा गगनदीप यांनी केला आहे.