“लाड यांचं वक्तव्य…” प्रवीण दरेकर यांनी दिल प्रसाद लाड यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण

Updated On:

मुंबई – भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं अजब विधान केलं आहे. आता यावरून चांगलच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. आधीच भागात सिंह कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा वाद पेटलेला होता त्यात आता लाड यांच्या विधानाने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी मंचावर भाजप नेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. आता दरेकर यांनी लाड यांच्या विधानाबाबत सारवासारव केली आहे.

लाड यांच्या वक्तव्याबाबत दरेकर म्हणतात, “प्रसाद लाड यांचं वक्तव्य अनावधानाने बोललेले होते, चूक लक्षात येताच लाड यांनी वक्तव्य सावरल्याचही दरेकर यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी केलेले वक्तव्य हे जाणीवपुर्वक नव्हते असं स्पष्टीकरण देखील यावेळी दरेकर यांनी दिल.

संजय राऊत यांनी देखील केली टीका
“कोण प्रसाद लाड ? ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का ? भाजप मधला कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलय” असा घणाघात संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करेल. महाराजांची भवानी तलवारचं यांच्या पक्षाचं मुंडक छाटणार आहे. रोज कोणीतरी उठतो आणि महाराजांवर भाष्य करतो. मला असं वाटायला लागलंय रोज यांच्या स्वप्नात अफझल खान,औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी मंत्र देतो त्यानुसार हे बोलतात अशी टीका राऊत यांनी यावेळी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलण्याची यांची लायकी आहे का ? रायगडावर महाराजांची समाधी आहे,पुण्यात त्यांचा जन्म झाला तुम्ही नवीन नवीन शोध लावताय. भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का ? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

आणखी संबंधित बातम्या

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

2026-10-07 17:37:34

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा