मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेले नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. Ladki Bahin Yojana | राज्यातील काही भागात पूराची स्थिती निर्माण झाल्यामुळे, तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आले नाही, अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या राज्यात २.३५ कोटी महिला लाभ घेत आहेत. यातील १.३ कोटी महिलांनी केवायसी केली नसल्याचे समोर आले होते. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतील केवायसीाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे सरकारकडून मुदत वाढ देण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana | केवायसी प्रोसेसमध्ये बदल लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी महिलांच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड लागते. मात्र ज्यांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांनी केवायसी कशी करणार? याबाबत आता वेबसाइटमध्ये बदल केले जाणार आहेत. आता या महिलांसाठी वेबसाइटवर नवीन सेक्शन तयार केले जाणार असून त्याद्वारे महिलांना केवायसी पूर्ण करता येणार आहे. Ladki Bahin Yojana |