Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी ! येणारा हप्ता 3000 येणार की 1500 ? शासन निर्णय जारी…
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्यासाठी 344.74 कोटींचा निधी वर्ग करण्याचा GR जारी. जुलै-ऑगस्टचे 3000 रुपये मिळणार की 1500? जाणून घ्या अपडेट.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
मात्र, जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्र देऊन महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होणार का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र देऊन 3 हजार रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. 2024 मध्येही महिलांना एकत्रित 3 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला होता. त्यामुळे यंदाही अशीच रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात तरतुदी वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विभागांच्या अन्य योजनांवर परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे.
यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये, तर जून 2025 मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये निधी वळवण्यात आला होता.





