लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! फेब्रुवारीचा हफ्ता ‘या’ दिवशी मिळणार ; आदिती तटकरेंनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana । राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सरकारने महत्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना मिळाला नव्हता. त्याबाबत आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्चचा हप्ता अधिवेशनानंतर Ladki Bahin Yojana ।
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली. मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विभागाला निधी मिळेल त्यानंतर दिला जाणार असल्याचे, असे तटकरे यांनी म्हटले. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून 3000 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहे.
आंतराष्ट्रीय महिला दिनाला 1500 रुपये मिळणार? Ladki Bahin Yojana ।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 24 तारखेला देण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यातील लाभ न मिळाल्यानं सरकारवर टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. आता 8 मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना फेब्रुवारी महिन्यांचे पैसे मिळतील. तर, मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील, म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 1500 महिलांना मिळतील.
महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणींना मिळतोय त्यातून विरोधकांमध्ये नैराश्य पसरलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले.





