प्रयोगशाळेत तयार केला ‘जगातला पहिला’ रुबी, काय आहे याचे वैशिष्ट्य?

लंडन । सिंथेटिक डायमंड म्हणजेच कृत्रिम पद्धतीने हिरे तयार केले जातात.आता शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत मौल्यवान रुबी तयार केला आहे खरेतर रुबी कृत्रिम नाही. रुबी तयार होण्यासाठी नैसर्गिक वातावरणात जास्त वेळ लागतो. परंतु हीच प्रक्रिया प्रयोगशाळेत जलद केली जाते प्लॅटिनम दागिने तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेदरम्यान संशोधकांनी ही किमया केली आहे. या प्रकारची जगातील ही पहिलीच प्रक्रिया आहे.
सोफी बून्स असं त्या संशोधकांचं नाव आहे. त्या ब्रिस्टॉलमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंड’ मध्ये वरिष्ठ प्राध्यापिका आहेत आणि दागिन्यांच्या डिझाइनमधील संशोधक आहेत.प्रयोगशाळेत रत्नं तयार करण्याचा प्रकल्प हा बून्स यांच्या पी. एच. डी. प्रबंधाचाच भाग आहे. या प्रकल्पातील यशामुळे त्यासाठी आता युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंडमधून दुसऱ्या टप्प्यातील निधी देखील मिळाला आहे.
सोफी बून्स यांनी प्रयोगशाळेत एक रासायनिक प्रकिया विकसित केली आहे. त्यामुळे रुबीची वाढ होण्याची प्रक्रिया जलद होते. या प्रक्रियेतून खऱ्या रत्नाचा एक छोटासा कण अनेकपटीने मोठा होतो.’युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीप्रमाणे , प्रयोगशाळेत आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं.
रत्नाला पैलू पाडताना जे बारीक कण पडतात त्याचा वापर करुन सोफी यांनी रुबी तयार केले आहे.
फ्लक्समुळे तापमान कमी होतं आणि त्याद्वारे रत्नाची वाढ होण्यास मदत होते.प्रयोगशाळेत पूर्णत: नव्यानंच तयार करण्यात आलेली रत्नं किंवा खाणीतून निघालेली रत्न उर्जा किंवा तापमानाच्या बाबतीत संवेदनशील असतात.त्याउलट रत्नांच्या वाया गेलेल्या कणांपासून किंवा तुकड्यांपासून भट्टीमध्ये माणिक किंवा रत्नं विकसित होतात किंवा आकारानं वाढतात.काही दिवसांतच ती विकसित होतात. यासाठी त्यांना भट्टीमध्ये फक्त पाच तास लागतात.
प्रयोगशाळेत रुबी तयार करण्यास 5 ते 50 तास लागतात असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्यामुळं रत्नं खाणीतून काढण्यात आलेल्या रत्नांपेक्षा अधिक स्वस्त असतात. कारण खाणीतून रत्नं काढणं, त्यांना पैलू पाडणं ही एकूणच प्रक्रिया महागडी असते. त्या तुलनेत प्रयोगशाळेतील रत्नांच्या बाबतीत याप्रकारचा बराचसा खर्च होत नाही. साहजिकच त्यांची किंमत तुलनात्मकरित्या कमी असते.





