‘जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है’, ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान व अभिनेत्री करीना कपूर खान यांचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. माँ कहती है जिंदगी गोलगप्पे की तरह होती है, पेट भरता है लेकीन मन नहीं भरता’, हा संवाद ट्रेलरमध्ये ऐकायला मिळाला आहे. चित्रपटाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांना अल्पवधीतच भला मोठा प्रतिसाद दिला आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एका सर्वसामान्य मुलाच्या असामान्य कथेची झलक दाखवण्यात आली आहे. मोना सिंगने लाल सिंगच्या आईची भूमिका साकारली आहे. लहानपणी दिव्यांग असलेल्या आमिरसोबत अचानक चमत्कार घडतो आणि तो मोठा होऊन धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतो. धावपटू झाल्यानंतर तो भारतीय सैन्यदलात सहभागी होतो. यावेळी दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यचीही झलक पहायला मिळते. करीना यामध्ये विम्मीची भूमिका साकारतेय, जिच्यावर लाल सिंगचं प्रेम असतं. तिच्यासोबत त्याला लग्न करायचं असतं, पण पुढे आपलं काहीच होऊ शकणार नाही, असे विम्मी त्याला म्हणताना ट्रेलरमध्ये दिसून येते.
अभिनेत्री करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा ट्रेलर शेअर करताना खास पोस्ट लिहिली. यामध्ये ती म्हणाली ‘करोना महामारी, दोन लॉकडाउन आणि त्यानंतर झालेलं बाळ.. या सर्वांमुळे हा प्रवास माझ्यासाठी खूपच खास आहे’, विशेष म्हणजे करीनाचा छोटा मुलगा ‘जेह’ हासुद्धा या चित्रपटाचा एक भाग होता, असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. करीना चित्रपटाच्या शूटिंगवेळी ती गरोदर होती.





