Kunal Kamra : हम होंगे कंगाल एक दिन.. कॉमेडियन कुणाल कामराने शेअर केला नवा व्हिडिओ

मुंबई : स्टँडअप कॉमेडिनय कुणाल कामरा (Kunal Kamra) याने काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवली. यानंतर शिंदे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत कामराचा (Kunal Kamra) शो झालेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली होती. या घटनेचे पडसाद अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. या सगळ्या प्रकारानंतर आता कुणाल कामराने आणखी व्हिडीओ बनवत शिंदे समर्थकांनी केलेल्या तोडफोडीवर टीका केली आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाल कामरा याने त्याच्या स्टँडअप स्कीटमध्ये विकसीत भारतातील बेरोजगारी, दंगली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य केले आहे. या व्हिडीओनंतर सत्ताधारी पक्ष अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आधीच एकनाथ शिंदेंवरील काव्यामुळे कामराच्या अडचणी वाढल्या आहेत.आता या व्हिडिओमुळे त्याच्या समोरील अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
👀👀👀 pic.twitter.com/C5Bnn81p5E
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 25, 2025
कुणाल कामराला बजावले समन्स
शिवसेना शिंदे गटाने केलेल्या राड्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा रात्रीच मुंबईतून पळून गेला. दरम्यान खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले आहे. प्रकरणाच्या तपासासाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे.
कुणाल कामरा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात
कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची हि पहिली वेळ नाही. याआधीदेखील तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीला ट्रोल केल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तसेच कुणाल कामराने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर त्याच्या कार्यक्रमातून टीका केली आहे. त्यामुळे हा वाद कुणाल कामरासाठी नवीन नाही आहे.
कोण आहे कुणाल कामरा?
कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडिअन आहे. त्याने 2017 पासून युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती. कुणालने 2017 मध्ये ‘शटअप कुणाल’ हा कॉमेडी शो सुरु केला होता. ‘शटअप कुणाल’ या कॉमेडी शोमुळेच त्याला सर्वात जास्त प्रसिद्ध मिळाली होती आणि सोशल मीडियावर तो पॉप्युलर झाला होता. त्यावेळी कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरवील, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, उमर खालीद, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या.
कुणाल कामराची (Kunal Kamra) युट्युब आणि सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. कुणालच्या युट्यूब चॅनेलवर 2.31 मिलियन फॉलोर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर त्याचे एक मिलिअन फॉलोवर्स आहेत. मात्र, कुणाल केवळ 12 लोकांना फॉलो करत आहेत. यामध्ये कन्हैया कुमार, वरुण ग्रोवर, श्याम रंगीला यांचा समावेश आहे. x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.





