झिंग उतरली, भाषा नरमली Thergaon Queenचा साथीदार कुणाल कांबळे पोलिसी खाक्यासमोर शरण, हात जोडून मागितली माफी

Updated On:

पुणे – थेरगाव क्वीनसोबत अश्लील भाषा आणि धमकीचे रील बनवणारा तिचा मित्र कुणाल राजू कांबळेला पिंपरी सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हा साक्षीसह इंस्टाग्रामवरील रील बनवायचा. याअगोदर साक्षी हेमंत श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी राकेश कश्यप (१८) यांना अटक करण्यात आली होती. तिघांवर कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता यांच्या सोबत अश्लील  करत रील बनवणाऱ्या साथीदार मित्र कुणालला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. पोलीसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर कुणालने हात जोडून माफी मागितली आहे.

माझ्या व्हिडीओमुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो मला क्षमा करावा असं कुणाल कांबळेने म्हटलं आहे. थेरगाव क्विन या अकाऊंटबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, थेरगाव क्वीनचे ४१ हजार फॉलोअर्स असून ते अधिक वाढवण्याच्या प्रयत्नात अश्लील भाषा, धमकीचे रील बनवत होती. परंतु, हीच अश्लील भाषा, धमकीचे रील यांनी त्यांना गजाआड केलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र