Satara | पुरामुळे कुमठे-सिध्देश्वर कुरोली वाहतूक ५ तास ठप्प

वडूज, (प्रतिनिधी) – राज्यात परतीच्या पाऊस सुरु असून खटाव तालुक्यात सर्वच ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार लावली आहे.
परतीच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. काल रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे नागाचे कुमठे- ध्देश्वर कुरोली वाहतुक पूलावरून पाणी गेल्यामुळे पाच तास ठप्प झाली होती.
कुमठे-कुरोली रस्त्यावरील पुल हा अरुंद असून उंचीला कमी आहे. त्यामुळे काल रात्री आलेल्या पावसाने कुंभेश्वर मंदिरासमोरील अरुंद पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेले.
त्यामुळे ४ ते रात्री ९ पर्यंत वाहतुक बंद होती. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्याचे व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
भविष्यात मोठा पाऊस झाल्यास पुराचे पाणी मानवी वस्तीलगत जावू शकते. तसेच गंजीचा माळेकडे वस्तीवर जाणाऱ्या लोकांचा संपर्क तुटू शकतो.
त्यामुळे सदर पूलाची उंची वाढवण्यासंदर्भात पाहणी करावी व पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी कुमठे व कुरोली येथील ग्रामस्थांकडून होत आहे.



