वादग्रस्त नियम बदलण्याची कुंबळे यांच्यावर जबाबदारी
Updated On:

नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये झालेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अनेक वादग्रस्त नियमांमुळे गाजली. अंतिम सामना “टाय’ झाल्यानंतर चौकारांचा नियम लावण्यात आला होता. त्यावरून झालेली टीका पुन्हा होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या नेतृत्त्वाखालील क्रिकेट समितीकडे याबाबत सविस्तर सूचना तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.
परिषदेचे सरव्यवस्थापक जिऑफ ऍलार्दिस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सामना “टाय’ झाला तर सुपरओव्हर घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यांमध्ये हाच नियम वापरला जात आहे. त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे काय याबाबत कुंबळे यांची समिती चर्चा करणार आहे.
टॅग्स:





