महाबळेश्वरच्या आखाड्यात कुमार शिंदेंचे शिलेदार सज्ज! उमेदवारांची नावे जाहीर होताच विरोधकांचे धाबे दणाणले

प्रभात वृत्तसेवा
महाबळेश्वर – महाबळेश्वर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व नियोजित गिरीस्थान नगरविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरणार असल्याची घोषणा आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात, महाबळेश्वरवासीयांच्या साथीने ही निवडणूक लढणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. गिरीस्थान नगरविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे आहे. प्रभागनिहाय उमेदवार- प्रभाग १ राज मोहम्मद इस्माईल नालबंद, प्रियांका अजित बावळेकर, प्रभाग २ प्रशांत महादेव आखाडे, सोनाली रोहित बांदल, प्रभाग ३ हेमंत बाळकृष्ण साळवी, पूजा तुषार उतेकर, प्रभाग ४ कुमार गोरखनाथ शिंदे, शर्मिला हणमंत वाशिवाले,
विमल पांडुरंग बिरामणे, प्रभाग ५ प्रभा विजय नायडू, प्रभाग ६ नीता आकाश झाडे, राहुल अशोक भोसले,प्रभाग ७ सलीम जब्बार बागवान, शबाना अल्ताफ मानकर, प्रभाग ८ स्वप्नाली कुमार शिंदे, संगीता शामराव गोंदकर, प्रभाग ९ संगीता प्रकाश हिरवे, मोअज्जम ताजुद्दीन नालबंद, प्रभाग १० सुनीता संदीप आखाडे.
“महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. मायबाप जनतेच्या आशीर्वादाने शहरात सकारात्मक बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
– कुमार शिंदे (मनगराध्यक्षपदाचे उमेदवार, महाबळेश्वर)





