Kumar Sanu | अफेअरच्या चर्चांवर अखेर कुमार सानूंनी सोडलं मौन

Kumar Sanu | लोकप्रिय गायक कुमार सानू त्यांच्या गाण्यासह वैयक्तिक आयुष्यातील वादामुळेही चर्चेत राहिले आहेत. अलीकडेच अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी ‘बिग बॉस १९’मध्ये अप्रत्यक्षपणे त्यांच्या आणि कुमार सानू यांच्याबरोबरच्या नात्याचा उल्लेख केला होता. याशिवाय त्यांचे नाव मीनाक्षी शेषाद्रीसोबत देखील जोडले गेले.
कुमार सानू यांनी नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. यावेळी त्यांना अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं. याच कारणामुळे त्यांचा पहिली पत्नी रीटा भट्टाचार्यसोबतचा घटस्फोट झाला, असा आरोप होता. यावर कुमार सानू यांनी स्पष्टीकरण देत “मीनाक्षी शेषाद्रीसोबत माझ्या अफेअरच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. मी तिला कधीच भेटलो नाही.”
दरम्यान, कुमार सानू आणि मीनाक्षी शेषाद्री यांची पहिली भेट महेश भट यांच्या ‘जुर्म’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झाली होती. याच चित्रपटासाठी कुमार सानू यांनी ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणे गायले होते, ज्यात मीनाक्षी शेषाद्री आणि विनोद खन्ना होते. तेव्हापासूनच कुमार सानू आणि मीनाक्षी यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. या अफवांमुळेच त्यांचं लग्न मोडलं, असंही म्हटलं गेलं. मात्र, कुमार सानू यांनी या सगळ्याला विरोध केला. Kumar Sanu |
यापुढे ते म्हणाले, “मी वुमनायझर असल्याचे देखील अनेकदा म्हंटले गेले. पण, जर ते खरं असतं तर माझ्या दुसऱ्या लग्नानंतरही असं काही घडलं. सलोनीबरोबरच्या लग्नाला आता २३ वर्ष झाली आहेत, पण या काळात तुम्ही कधी ऐकलं का की, माझं कोणत्या दुसऱ्या महिलेबरोबर नाव जोडलं गेलं? नाही ना? त्यामुळे या सगळ्या केवळ अफवाच होत्या.” दरम्यान, कुमार सानूने रीटा भट्टाचार्यसोबत घटस्फोट घेतल्यावर, १९९४ मध्ये सलोनी भट्टाचार्यसोबत दुसरं लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत. Kumar Sanu |
हेही वाचा:





