केआरके म्हणाला, ”सुशांतला या प्रोडक्शन हाऊसने केले होते ‘बॅन”

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतने हिंदी सिनेसृष्टीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर आता स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान याने बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. सुशांतचं करिअर काही महिन्यांपूर्वीच संपलं होतं असं केआरकेने म्हटलं आहे. सोबतच सुशांतचं करिअर कोणत्या कंपन्यांमुळे उद्धवस्त झालं हेदेखील त्याने सांगितलं आहे. सध्या त्याने केले ट्विट सोशल माध्यमांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे.
It’s the truth that Only 6 companies control entire Bollywood and they can finish anyone’s career if they don’t like him/her!
1) Dharma (Karan Johar)
2) YRF ( Aditya Chopra)
3) TSeries (Bhushan)
4) Balaji ( Ekta Kapoor)
5) Nadiadwala (Sajid)
6) Salman khan films!— KRK (@kamaalrkhan) June 16, 2020
केआरके ट्विट केले आहे की,’बॉलिवूडमध्ये या ६ कंपन्यांचं नियंत्रण आहे हे खरं आहे का ? या कंपन्यांना जर एखादी व्यक्ती आवडत नसेल तर ते तिची करिअर उद्धवस्त करुन टाकतात, असं ट्विट केआरकेने केलं आहे. यात धर्मा प्रोडक्शन (करण जोहर), यशराज फिल्म्स (आदित्य चोप्रा),टी-सीरिज( भूषण), बालाजी प्रोडक्शन( एकता कपूर), नाडियादवाला(साजिद) आणि सलमान खान फिल्म, या कंपन्यांची नावं केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये दिली आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कमाल आर खानने सुशांतच्या करिअरविषयी एक ट्विट केलं होतं.’





