क्रिती सेननचा मोठ्या चित्रपटातून पत्ता कट; ‘या’ अभिनेत्रीला मिळाली संधी

Kriti Sanon | आनंद एल राय निर्मित एका महत्त्वाकांक्षी चित्रपटातून अभिनेत्री क्रिती सेननला वगळण्यात आले आहे. ‘नई नवेली’ नावाच्या या चित्रपटासाठी क्रितीचे नाव जवळपास निश्चित झाले होते, पण आता तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीने ती जागा देण्यात आली आहे.
क्रितीला या चित्रपटातून काढून तिच्या जागी यामी गौतमने घेतले आहे. यामीने ‘आर्टिकल 370’ मधील आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. आता असे म्हटले जात आहे की यामी या हॉरर कॉमेडी प्रकारच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय लोककथांवर आधारित आहे. यामी गौतमच्या चित्रपटातील प्रवेशानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
View this post on Instagram
चित्रपटातून बाहेर काढण्यामागचे कारण अस्पष्ट
यापूर्वी क्रिती सेनन मुख्य भूमिकेसाठी निश्चित झाल्याची माहिती मिळाली होती, जे आनंद एल राय यांच्यासोबत तिचे दुसरे सहकार्य ठरले असते. ‘तेरे इश्क में’ नंतर तिला पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. क्रिती सेननला चित्रपटातून बाहेर काढण्यामागचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन कामाला जानेवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे, तर त्यानंतर लगेच चित्रीकरणही सुरू होईल. Kriti Sanon |
सध्या अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या आगामी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाच्या टीझरमुळे चर्चेत आहे. क्रितीने नुकतेच ‘कॉकटेल २’ चे चित्रीकरण इटलीमध्ये संपवले आहे, ज्यात ती शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. पण याचदरम्यान, क्रितीला एका मोठ्या चित्रपटातून बाहेर पडावे लागले आहे. Kriti Sanon |
हेही वाचा:
“…तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील”; वाल्मिक कराडच्या नावाने थेट आर्थिक मदतीचे आवाहन





