मुंबई – अभिनेत्री क्रिती सॅननने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. नुकतेच तिने ‘आदिपुरुष’ या चित्रपटात ‘जानकी’च्या भूमिकेत दिसली होती. मात्र या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र आता क्रितीने अभिनयासह आता आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
क्रिती आता एक निर्माती म्हणून करिअरची सुरुवात करणार आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक क्रितीने तिच्या प्रोडक्शन हाऊसचा टीझर शेअर केला आहे. ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. यानंतर तिचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. अनेक सेलिब्रिटींंनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CuRvw89t7GI/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
याबाबत क्रिती म्हणाली की, नवी सुरुवात करण्यासाठी खूप उत्साहित आहे. गियर बदलण्याची वेळ आली आहे. या इंडस्ट्रीत मी नऊ वर्षांपासून माझे स्वप्न जगत आहे. मला चित्रपट निर्मितीचा प्रत्येक पैलू आवडतो. आता काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे. माझ्या आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणखी कथा सांगण्याची वेळ आली आहे, आशा आहे की तुम्हाला ते खूप आवडेल.” ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचेही तिने सांगितले आहे.
दरम्यान,टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने दिलवाले, हाउसफुल 4, बरेली की बर्फी, लुका छुपी, आदिपुरूष यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.