Kris Gopalakrishnan FIR । कर्नाटक पोलिसांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक सेनापती क्रिस गोपालकृष्णन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) चे माजी संचालक बलराम यांच्यासह इतर १६ जणांविरुद्ध SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ७१ व्या दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार बेंगळुरूमधील सदाशिव नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे? Kris Gopalakrishnan FIR । एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बोवी समुदायाशी संबंधित आणि आयआयएससीच्या सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी मेंबर म्हणून काम करणाऱ्या तक्रारदार दुर्गाप्पा यांनी या सर्वांवर गंभीर आरोप केले आहेत. दुर्गाप्पा यांनी आपल्या तक्रारीत, त्यांना खोट्या हनी ट्रॅप प्रकरणात अडकवून त्यांच्याविरुद्ध कट रचण्यात आला आणि त्यानंतर त्यांना आयआयएससीमधील नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ” असा आरोप केला आहे. त्यासोबतच तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे की ‘या काळात त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि धमक्या देण्यात आल्या.” दुर्गाप्पा यांनी आरोप केला की क्रिस गोपालकृष्णन, गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संध्या विश्वेश्वरय्या, हरी केव्हीएस, दासप्पा, बलराम पी, हेमलता मिशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावरकर आणि मनोहरन यांच्यासह एकूण १८ जण या कटात सहभागी होते. क्रिस गोपालकृष्णन कोण आहेत? Kris Gopalakrishnan FIR । दरम्यान , या प्रकरणावर आयआयएससी किंवा क्रिस गोपालकृष्णन यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. क्रिस गोपालकृष्णन हे इन्फोसिसच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत आणि त्यांनी २००७ ते २०११ पर्यंत कंपनीचे सीईओ आणि एमडी म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, त्यांनी २०११ ते २०१४ पर्यंत इन्फोसिसचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. क्रिस गोपालकृष्णन यांना त्यांच्या योगदानाबद्दल २०११ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी आयआयटी मद्रासमधून भौतिकशास्त्र आणि संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनिअर्स (INAE) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (IETE) चे फेलो देखील आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराचा आरोप आहे की उच्च पदांवर असलेल्या या लोकांनी जातीच्या आधारावर भेदभाव करण्याचा आणि त्याचे शोषण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.