Phaltan: क्रांतीसूर्य प्रतिष्ठानतर्फे वारकर्यांना औषधांचे वाटप
Phaltan या उपक्रमाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या सौभाग्यवती डॉ. सौ. पूजा देखणे यांच्या हस्ते करण्यात आला.

Phaltan: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथे आगमन झाल्यानंतर वारकर्यांच्या आरोग्यसेवेसाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने विविध सेवाभावी संस्था व वैद्यकीय केंद्रांना आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या सौभाग्यवती डॉ. सौ. पूजा देखणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फलटण येथील ज्येष्ठ व प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अवधूत गुळवणी, डॉ. प्रसाद जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मिलिंद नेवसे आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक-केंद्र फलटण, समर्थ प्रतिष्ठान फलटण, राजे उमाजी नाईक तालीम गणेश उत्सव मंडळ फलटण, युवा सेवक प्रतिष्ठान फलटण, लायन्स क्लब फलटण तसेच लोकमान्य हॉस्पिटल फलटण या संस्थांना विविध प्रकारची आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. या औषधसाठ्याच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकर्यांना मोफत व तात्काळ वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळाला.





