क्रांती रेडकरने युझर्सला दिले सडेतोड उत्तर; म्हणाली “मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्ही घेता का?”

मुंबई – अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) अभिनयासह एक निर्माती, दिग्दर्शिका या भूमिका देखील उत्तमरित्या पार पाडताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील क्रांती सक्रिय असल्याचे दिसते. अनेक व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र एका सोशल मीडिया युझर्सने केलेल्याला एका कमेंटला क्रांती रेडकरने सडेतोड उत्तर दिले आहे.
माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची क्रांती पत्नी आहे. तिने २०१८ मध्ये जु्ळ्या मुलींना जन्म दिला. दोघींची घरी काय मस्ती सुरु असते हे क्रांती अनेकदा व्हिडिओतून सांगत असते. नुकतंच क्रांतीच्या घरी कन्या पूजन पार पडले. यामध्ये दोन्ही मुली सुद्धा सहभागी झाल्या होत्या. याचा व्हिडिओ क्रांतीने शेअर केला परंतु यात दोघींचा चेहरा दाखवला नाही.
यावरून एका चाहतीने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, ‘मॅडम तुम्ही स्वतःच्या मुलींचे चेहरे दाखवले नाही आणि इतर मुलींचे व्हिडीओ काढून त्यांचे चेहरे दाखवताय तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. पूर्ण व्हिडिओ मध्ये स्वतःच्या मुलींचे बॅकसाईडने व्हिडिओ घेतला शोभत नाही तुम्हाला.’
View this post on Instagram
यावर क्रांती म्हणाली, ‘आईवडीलच काढत होते व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी काळजी नसावी आणि छबिल गोदोच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्ही घेता का? एवढ्या धमक्या येत असताना तर मी दाखवते चेहरे. निदान व्हिडिओची भावना तरी समजून घ्या. सारखं आपलं तत्वज्ञान झाडू नये. सतत निगेटिव्ह होऊ नका’
दरम्यान, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप लावले होते. त्यानंतर क्रांतीने सुरक्षेसाठी मुलींचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही.





