Koyna River Drowning | मासेमारीचा छंद जीवावर बेतला ; कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पाटण – गुंजाळी, ता. पाटण येथे कोयना नदीपात्रात मासेमारी करायला गेलेल्या महादेव रामचंद्र लाड (वय 47) यांचा शनिवारी (दि. 6) दुपारी 4 च्या सुमारास बुडून मृत्यू झाला.गुंजाळी हे गाव कोयना नदीपात्रानजीक असून, तेथील महादेव लाड हे शनिवारी (दि. 6) दुपारी मासेमारीसाठी नदीकाठावर गेले होते. त्यादिवशी गणपती विसर्जन असल्याने, सर्व जण व्यग्र होते.
महादेव लाड हे रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी कोयना नदीपात्रात सिंचन योजनेजवळ त्यांचा मृतदेह आढळला. महादेव लाड यांना फिटस्चा त्रास होता. ते फिट येऊन नदीत पडले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे.





