Koyna Dam Water : कोयना धरणाचं पाणी मुंबईला देणार? नेमका वाद काय? वाचा राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
Koyna Dam Water : कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याच्या प्रस्तावावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद सुरू झाला आहे.

Koyna Dam Water : कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात वाहून जाणारे पाणी मुंबई महानगर प्रदेशाच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याच्या प्रस्तावावरून महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू झाला आहे. या प्रस्तावाला पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकप्रतिनिधी आणि कोकणातील नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. (Koyna Dam Water)
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ नोव्हेंबर रोजी या विषयावर स्पष्टीकरण देताना सध्या पाणी वळवण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. (Koyna Dam Water)
कोयना धरणाचं महत्त्व आणि पाण्याचं गणित काय?
सुमारे १,९६० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता असलेला कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेतील महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोयना धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता सुमारे १०५ टीएमसी आहे. (Koyna Dam Water)
उपलब्ध माहितीनुसार, धरणातील ६७.५ टीएमसी पाणी पोफळी येथील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. वीजनिर्मितीनंतर हे पाणी वशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात जाते. याच पाण्याचा काही भाग मुंबईकडे वळवता येईल का, याची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याची चर्चा आहे. (Koyna Dam Water)
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून विरोध का?
कोयना धरण सातारा जिल्ह्यात असूनही सातारा, सांगली आणि सोलापूरमधील अनेक दुष्काळी भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुंबईकडे पाणी वळवण्यापूर्वी स्थानिक भागांच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण कराव्यात, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली आहे. (Koyna Dam Water)
खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, सुहास बाबर आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी स्थानिक पाण्याच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला आहे. (Koyna Dam Water)
दुसरीकडे, वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून कोकणात येणाऱ्या पाण्यावर स्थानिक गावे आणि उद्योगांच्या गरजांचा विचार व्हावा, अशी भूमिका कोकणातील काही नेत्यांनी मांडली आहे. पाणी मुंबईकडे वळवण्यापूर्वी कोकणाच्या हिताचे संरक्षण करावे, अशी त्यांची मागणी आहे. (Koyna Dam Water)
फडणवीस म्हणाले, ‘कोणाचंही पाणी पळवणार नाही’
वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. वीजनिर्मितीनंतर जवळपास ६० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी उपयोगात आणता येईल का, याचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Koyna Dam Water)
हे पाणी मुंबईपर्यंत आणणे सोपे नाही. त्यासाठी पाणी उचलण्याची आणि पुढे वाहून नेण्याची तांत्रिक व्यवस्था तपासावी लागेल. कोकणातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांचाही विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Koyna Dam Water)
कोणाचेही हक्काचे पाणी पळवून मुंबईला देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत, सर्वांच्या चिंता समजून घेतल्यानंतरच पुढील विचार केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे सध्या हा प्रस्ताव अभ्यासाच्या टप्प्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Koyna Dam Water)
एकीकडे मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी नवा स्रोत शोधण्याचा विचार सुरू आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पाण्याच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तांत्रिक अभ्यास, स्थानिक गरजा आणि पाणीवाटपाचा समतोल साधून सरकार पुढे काय निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Koyna Dam Water)
koyna dam water release : कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा





